
देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधी, उद्धव ठाकरेंना सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर दिले. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात असल्याचाही दावा त्यांनी केला. तसेच राहुल गांधी देशात आहेत की परदेशातून सोशल मीडियावरून प्रश्न विचारत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या 'राम रक्षा आंदोलन'वर भाष्य करत, रामरक्षेची माहिती नसताना आंदोलन कसे करता, असा प्रश्न त्यांनी विचारला. आंदोलनात सहभागी होऊन रामरक्षा पठण करण्यास आपण तयार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
