Devendra Fadnavis: अग्निवीरांना नोकरी देणार

Share this Video

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या निकषात न बसलेल्या पण प्रत्यक्षात पिके करपलेल्या तालुके आणि मंडळांमध्ये ‘ग्राउंड ट्रुथिंग’ करून शेतकऱ्यांना दुष्काळाचे लाभ देण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. परतणाऱ्या अग्निवीरांना पोलीस, कोस्टल सिक्युरिटी आणि इतर सरकारी पदांमध्ये सामावून घेतले जाणार असून त्यांच्यासाठी परीक्षा व प्रशिक्षणाची अट नसेल आणि वयोमर्यादेत चार वर्षांची सूट दिली जाईल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत मुख्य सचिवांची समिती अर्जांचा विचार करत असून कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, यासाठी व्यापक सहमतीचा प्रयत्न असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Related Video