
Eknath Shinde l एकनाथ शिंदेंचा विरोधकांना 'रेजिम चेंज'वर टोला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात १,४४० डॉक्टरांची नियुक्ती झाल्याची माहिती दिली. आणखी ५०० ते ५५० डॉक्टर लवकरच सेवेत दाखल होणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत, शिवसेनेकडून तालुकास्तरावर मदत आणि शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णयही त्यांनी सांगितला. विरोधकांवर संविधानिक संस्थांचा अपमान आणि अराजकता पसरवण्याचा आरोप करत 'रेजिम चेंज'चा निर्णय जनता घेते, असं शिंदे म्हणाले. तसेच मतचोरीच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करत 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव' मोहिमेचं समर्थन केलं.