
Dhruv Rathee Press Conference
दिल्लीत पत्रकार परिषद घेत यूट्यूबर ध्रुव राठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 12 वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याची टीका केली. पोलिसांनी घरात घुसून कुटुंबीयांना धक्काबुक्की करत जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला. आपण भारतीय नागरिक असल्याचे पासपोर्ट दाखवून स्पष्ट केले. मतदार यादीतील कथित अनियमितता, पश्चिम बंगालमधील 70 हजार मतदारांची नावे वगळल्याचा दावा आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मोदी, शाह आणि ज्ञानेश कुमार यांना तीन प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान दिले. शांततापूर्ण आंदोलन, विरोधकांची एकजूट आणि निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत बदल करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. परदेशी शक्तींशी संबंध असल्याचे आरोप त्यांनी फेटाळले.