
Devendra Fadnavis l दिया मिर्झाच्या व्हिडिओवर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर
पुणे मेट्रो मार्गिका ३ च्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ किमी मार्गिका आणि २३ स्थानकांमुळे वाहतूककोंडी कमी होणार असल्याचे सांगितले. पिंक लाईनवरील सर्व मेट्रो पायलट महिला असून ५० टक्के कर्मचारी महिलाच आहेत. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील चार मार्गिकांचे भूमिपूजन झाले असून भविष्यात १२० किमीचे नेटवर्क तयार होणार आहे. पीएमआर ग्रोथ सेंटरसाठी ५ हजार कोटी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिलेले ५ हजार रुपये अग्रिम मदत असल्याचे स्पष्ट करत विरोधकांवर टीका केली. एकात्मिक तिकीट प्रणालीचे उर्वरित काम आणि मेट्रोची अपूर्ण कामे पूर्ण करणार असल्याचे सांगितले. दिया मिर्झाचा व्हिडिओ हटवणे हा BMC चा अधिकार असून हा आपल्या स्तरावरील विषय नसल्याचे फडणवीस म्हणाले.