
Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील अग्निवीरांना पोलीस दलात सामावून घेण्याच्या निर्णयाची माहिती दिली. नौदलातून कार्यकाळ पूर्ण करून परतलेल्या 250 हून अधिक अग्निवीरांना महाराष्ट्राच्या सागरी पोलीस दलात थेट नियुक्ती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अग्निवीरांनी सैन्यात कठोर प्रशिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांना स्वतंत्र भरती चाचणीतून सूट देण्यात आली आहे. यासाठी काही नियमांमध्ये बदल करून थेट नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या प्रशिक्षित जवानांमुळे महाराष्ट्राची सागरी सुरक्षा अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात लष्कर आणि हवाई दलातून परतणाऱ्या इच्छुक अग्निवीरांनाही महाराष्ट्र पोलीस दलात काम करण्याची संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.