
Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका मांडली. मराठा समाजासाठी आजपर्यंतचे निर्णय सरकारने घेतले असून त्याचा प्रत्यक्ष फायदाही समाजाला झाला आहे, असे फडणवीस म्हणाले. संविधानाच्या चौकटीत आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असलेले सर्व काही मराठा समाजाला मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.एका समाजाच्या वाट्याचे काढून दुसऱ्या समाजाला देण्याची सरकारची भूमिका नसून मराठा समाजासह सर्व समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करू आणि चर्चेची दारे कधीही बंद केलेली नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत उपस्थित प्रश्नावर सर्व मुद्द्यांची सोडवणूक झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जर अजून काही त्रुटी किंवा शंका असतील तर त्या विचाराव्यात, त्या दूर केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.