
Farmer Loan Waiver l देवेंद्र फडणवीसांकडून ७३ लाख शेतकऱ्यांना ₹५००० l Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील सुमारे ७३ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ५ हजार रुपयांची आगाऊ मदत जमा करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचणार असून उर्वरित ५ टक्के शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे विलंब होऊ शकतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत ४ लाख ८६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत ४,७६४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये मराठवाड्यातील २ लाख ७६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत २१ लाख शेतकऱ्यांना सुमारे १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.