कांदा दरांवर समृद्धी रोखली, दानवेंचं सरकारला थेट आव्हान

Share this Video

महाराष्ट्रात कांदा प्रश्न पुन्हा पेटला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने समृद्धी महामार्गावर चक्का जाम आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरांचा मुद्दा ऐरणीवर आला.केंद्र सरकारने 12.35 रुपये प्रति किलो दर जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनानंतर पोलिसांनी दानवेंना ताब्यात घेतलं.पाहा संपूर्ण रिपोर्ट.

Related Video