अंबादास दानवे: उपसभापती निवडणुकीसाठी जमू अभ्यंकर उमेदवार

Share this Video

महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार जमू अभ्यंकर यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली. संख्याबळ कमी असले तरी लोकशाहीत निवडणूक लढवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय त्यांनी वन विभागाच्या जमिनीचा मुद्दा, अवैध वाळू साठे आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. राम मंदिर दानपेटी प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्यावरही त्यांनी टीका केली. तसेच सभागृहात अधिकारी अनुपस्थित राहिल्यास त्यावर कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Related Video