Nana Patole

Share this Video

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील ड्रग्जचा वाढता प्रसार, महिला अत्याचार आणि तरुणांच्या भवितव्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ची घोषणा केली जात असली तरी राज्यात ड्रग्ज माफियांच्या कारवाया वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. याचा सर्वाधिक परिणाम तरुण पिढीवर होत असल्याचे ते म्हणाले.ड्रग्जशी संबंधित बेकायदेशीर कारवायांना भाजपचे संरक्षण असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. ग्रामीण भागासह पुण्यासारख्या शहरांमध्ये महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. या समस्या सोडवण्यासाठी सरकारकडे निधी आणि ठोस उपाययोजनांचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली.राहुल गांधी यांच्या उपक्रमाबाबत बोलताना पटोले यांनी हा पक्षीय किंवा राजकीय कार्यक्रम नसल्याचे सांगितले. सध्याच्या धोरणांमुळे तरुण पिढीच्या भवितव्यावर होणाऱ्या परिणामांविरोधात राहुल गांधी काम करत असून हा उपक्रम राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Video