
हर्षवर्धन सपकाळ: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, संसदेत NEET पेपरफुटीवर सविस्तर चर्चा व्हावी आणि विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व FIR मागे घ्यावेत, अशी काँग्रेसची भूमिका त्यांनी मांडली. राहुल गांधींना आंदोलनादरम्यान दिलेल्या वागणुकीचाही त्यांनी निषेध केला. मुंबईतील भाजप कार्यालयात संविधान भेट देऊन शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.