
लोकसभेत नक्षलवादावर अमित शाह यांचा दावा, काँग्रेसकडून अतुल लोंढे पाटील यांचा जोरदार पलटवार
लोकसभेत नक्षलवादाविरोधातील लढ्यावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहार, महाराष्ट्र, ओडिशा आणि झारखंडमध्ये 2024 पूर्वीच नक्षलवाद जवळपास संपल्याचा दावा केला. त्यांनी छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारवर नक्षलवाद्यांना संरक्षण दिल्याचा आरोपही केला.यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी नक्षलवाद संपत असल्याचे स्वागत केले, मात्र केंद्र सरकारच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या कामगिरीचे समर्थन केले. त्यांनी चाबहार बंदराच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारवर टीका केली.या वक्तव्यांमुळे नक्षलवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.