
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार
महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि शरद पवार गटाच्या सातत्यपूर्ण विनंतीनंतर काँग्रेसने आपला उमेदवार माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.रोहित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांनी काँग्रेसला निवडणूक न लढवण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘सभ्यता आणि संस्कृती’ जपत माघार घेतली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.तरीही काँग्रेसने 2029 च्या निवडणुकीत बारामतीत ताकदीने उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचे आरोप करत भारतीय जनता पक्ष विरोधात तीव्र भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.