
LPG तुटवड्यावर CM फडणवीसांचे स्पष्टीकरण: "राज्यात कुठेही गॅसची कमतरता नाही"
नागपूरमधील बुटीबोरी येथे 10GW Integrated Solar Ingot आणि Wafer Manufacturing Facility च्या भूमिपूजन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी LPG तुटवड्याच्या मुद्द्यावर विरोधकांवर टीका केली. त्यांनी स्पष्ट सांगितले की राज्यात कुठेही LPG गॅसचा तुटवडा नाही आणि काही विरोधी पक्षाचे नेते जाणूनबुजून लोकांमध्ये भ्रम आणि भीती निर्माण करत आहेत.