अभिजीत दीपके: मोदींची पदवी जाहीर करण्याची मागणी

Share this Video

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे अभिजीत दीपके यांनी ५ तारखेला होणाऱ्या कोअर टीम बैठकीची माहिती दिली. या बैठकीत संघटन विस्तार, पुढील आंदोलनाची दिशा आणि रोडमॅपवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष स्थापन करण्याचा सध्या कोणताही विचार नसून सार्वजनिक चळवळ म्हणूनच CJP पुढे नेण्याची भूमिका त्यांनी मांडली.शिक्षणाबाबत दाखल झालेल्या तक्रारीवर बोलताना, आपण शिष्यवृत्ती, एज्युकेशन लोन आणि पदवीचे कागदपत्र सार्वजनिक करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपली पदवी सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली.झारखंडमधील पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला CJPचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गरज पडल्यास पुन्हा जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासही आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Video