
देवेंद्र फडणवीस : भिवंडी दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई
भिवंडीतील धोकादायक घोषित केलेली इमारत कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. महापालिकेच्या नोटिशीनंतरही कंत्राटदाराने दुरुस्तीचे काम सुरू ठेवल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत दिली जाईल तसेच जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित कंत्राटदारावर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय धोकादायक (C-1) इमारतींमधील रहिवाशांना आवश्यक असल्यास सक्तीने बाहेर काढण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.