सार

Ayodhya Ram Mandir : श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीच एशियानेट न्यूजची टीम अयोध्येत दाखल झाली आहे. आम्हाला येथे एक अशी व्यक्ती भेटली, जे या रामनगराशी पूर्णतः एकरूप झाले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दलची कहाणी...

 

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराची ऐतिहासिक महती आणि पौराणिक इतिहास शब्दांमध्ये मांडणे शक्य नव्हे, असे म्हणतात. आता येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील श्री राम मंदिरात रामलला यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. दरम्यान या रामनगराशी एकरूप झालेल्या अशा अनेक व्यक्ती आपल्या येथे भेटतील.

ज्यांनी काही कारणास्तव या नगरीत पाऊल ठेवले आणि पुढे या नगराशी पूर्णतः एकरूप झाले. उत्तर प्रदेशातील बहराइच शहरातील रिसिया येथील रहिवासी रामफल प्रजापती हे देखील यांपैकीच एक आहेत. मुस्लिम बांधवांकडून श्रीराम मंदिरासाठी कोरीवकाम करण्यात आलेल्या दगडांची स्वच्छता करण्यात येत असल्याच्या वृत्ताने रामफल यांना प्रेरणा मिळाली आणि यानंतर त्यांनीही आपले जीवन रामसेवेसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

‘एशियानेट न्यूज’ची टीम राम मंदिरासाठी तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींची कार्यशाळा ‘राम कथा कुंज’ येथे पोहोचली, त्यावेळेस एक ज्येष्ठ नागरिक (रामफल प्रजापती) भाविकांना रजिस्टर पुस्तिकेमध्ये त्यांना आपल्या प्रतिक्रिया लिहिण्याची विनंती करत होते. भगवान श्रीराम यांच्या जन्मापासून ते परिसरातील महत्त्वपूर्ण घटना या मूर्तींच्या माध्यमातून दर्शवण्यात आल्या आहेत. रामफल यांनी सांगितले की, येथे मूर्ती तयार केल्या जातील. राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर मंदिराच्या चहुबाजूंना या मूर्ती बसवल्या जातील. जेणेकरून रामललांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक प्रदक्षिणा घालतील, त्यावेळेस या मूर्तींच्या माध्यमातून त्यांच्या डोळ्यांसमोर रामकथेचे चित्र निर्माण होईल.

रामफल वर्ष 1984मध्ये आले होते अयोध्येत

रामफल प्रजापती यांनी सांगितले की, "जेव्हा श्री रामजन्मभूमीचे कुलूप उघडण्यासाठी आंदोलन सुरू झाले होते. वर्ष 1984मध्ये त्या दिवशी तारीख होती 7 ऑक्टोबर. यावेळेस सर्व भाविक भगवान श्रीरामाच्या चरणी जमले होते. त्याच दिवशी संकल्प केला. यानंतर सात दिवस रथयात्रेत सहभागी होऊन रथ चालवून लखनौमध्ये पोहोचलो. पण कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने संत म्हणाले की, तुम्ही सर्वजण घरी जा. यानंतर 2 डिसेंबर या दिवशी दिल्लीतील रामलीला मैदानावर जमा होण्याचा निर्णय घेण्यात आला.

"…अन् सरकारी नोकरी गेली"

बहराइच शहरातील रिसिया येथील गायत्री विद्यापीठ पीजी कॉलेजमध्ये रामफल वॉटरमन या पदावर कार्यरत होते. त्यांनी सांगितले की, श्री रामजन्मभूमीचे कुलूप उघडल्यानंतर रामसेवेसाठी पुन्हा अयोध्येत यायचे होते. पण आमच्या कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी परवानगी दिली नाही. म्हणून 3 एप्रिल 1987 रोजी कोणालाही काहीही न सांगता रात्रीच्या वेळेस मी अयोध्येत पोहोचण्यासाठी पळ काढला. यामुळे मला सरकारी नोकरी गमवावी लागली. यानंतर येथे मी राममंदिर आंदोलनाचे प्रमुख जगद्गुरू रामानंदाचार्य शिवरामाचार्य यांच्या आश्रमात तीन महिने राहिलो. दुर्दैवाने वर्ष 1988 मध्ये त्यांचे निधन झाले. रामाचे कार्य करायचे आहे, असा आदेश त्यांनी दिला होता, त्यामुळे रामसेवेतच व्यस्त झालो.

बबलू खान यांच्या कार्यामुळे मिळाली प्रेरणा

रामफल यांनी पुढे असेही सांगितले की, “श्री रामजन्मभूमीच्या शेजारी एक वटवृक्ष आहे. तेथे रामायणाचे पठण होत असे. दुपारी 3 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रामायण पठणाची जबाबदारी आमच्यावर असायची. यानंतर अधे-मधे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गावाकडेही मी जात असे. यादरम्यान 18 ऑक्टोबर 2018 रोजी मी एक बातमी वाचली की, बबलू खान नावाचे गृहस्थ 100 मुस्लिम कारसेवकांसह राम मंदिरासाठी कोरीवकाम करण्यात आलेल्या दगडांवर जमा झालेले शेवाळे स्वच्छ करण्यासाठी कारसेवा करणार आहेत. ही बातमी वाचून मला अपराध्यासारखे वाटले आणि मग मी पुन्हा अयोध्येत दाखल झालो. त्या दिवसापासून माझी पावले घराकडे वळलीच नाहीत. रामसेवेतच स्वतःचे संपूर्ण आयुष्य मी समर्पित केले”.

आणखी वाचा :

काय सांगता! चक्क राम मंदिराच्या थीमवर आधारित तयार केलाय नेकलेस, पाहा VIDEO

Ram Mandir Ceremony : राम मंदिरासाठी नवी सुरक्षाव्यवस्था, तपासाशिवाय कोणालाही आतमध्ये जाण्यास परवानगी नाही

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या सोहळ्यासाठी अयोध्येतील हॉटेलच्या किंमतीत दहापट वाढ