
अण्णा हजारे यांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
अहिल्यानगर येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलन, सीजेपी आंदोलन आणि लाठीचार्ज प्रकरणावर भूमिका मांडली. कोणताही प्रश्न हिंसाचाराने सुटत नाही, तर अहिंसेच्या मार्गानेच तोडगा निघतो, असे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांत आपण उपोषणाची आंदोलने केली, मात्र हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही, याचीही त्यांनी आठवण करून दिली.विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज चुकीचा असल्याचे सांगत त्यांनी त्याचा निषेध केला. देशातील युवक हीच देशाची ताकद असून आंदोलनही अहिंसक पद्धतीने व्हावे, असे त्यांनी म्हटले. लाठीचार्ज प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही अण्णा हजारे यांनी केली.