
आनंद दुबेंचा NEET पेपर लीकवर हल्लाबोल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी NEET पेपर लीक प्रकरणावरून केंद्र सरकार आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार टीका केली.“NTA मधील अधिकाऱ्यांचाच संबंध पेपर लीकशी जोडला जात आहे,” असा आरोप करत त्यांनी २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचं म्हटलं.महागाई, CNG-पेट्रोल दरवाढ, रुपयाची घसरण, न्यायव्यवस्था आणि NDA सरकारच्या धोरणांवरही त्यांनी निशाणा साधला.तसंच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार गटावरही दुबेंनी जोरदार टीका केली.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
