अमृता फडणवीस यांनी केले ई-रिक्षा उपक्रमाचं कौतुक

Share this Video

मुंबईत आयोजित कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी गरजू महिलांना ई-रिक्षा वितरण उपक्रमाचे कौतुक केले. भाला फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. ई-रिक्षामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार असून महिलांना रोजगाराचे साधनही उपलब्ध होणार आहे.यावेळी त्यांनी महिला व बालविकास, ॲसिड हल्लाग्रस्त महिलांचे पुनर्वसन, पालघरमधील कुपोषण आणि गर्भवती महिलांच्या समस्यांवरही भाष्य केले. तसेच इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि साधी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करत पुढील पिढीसाठी चांगला वारसा निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video