अमृता फडणवीस: Gen-Z चं आंदोलन योग्य दिशेने होतं, नंतर भरकटलं

Share this Video

अमृता फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याच्या चर्चेवर बोलताना, देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे सेवक असून त्यांनी महाराष्ट्रातच सेवा करत राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र ही देशासाठी महत्त्वाची आणि सर्वाधिक योगदान देणारी राज्यांपैकी एक असल्याचेही त्यांनी सांगितले.Gen-Z संदर्भात अमृता फडणवीस यांनी जंतर-मंतर आंदोलनाच्या सुरुवातीचा मुद्दा NEET पेपर लीकविरोधातील असल्याने योग्य असल्याचे म्हटले. मात्र, त्यानंतर विविध घटक सहभागी झाल्याने आंदोलनाची दिशा भरकटली, असे त्यांनी सांगितले. विकसित भारत 2047 आणि Make in India साकारण्यासाठी तरुणांना आवश्यक सुविधा देण्यावर सरकार काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.महिलांच्या निर्णयस्वातंत्र्याबाबत बोलताना, महिलेला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार असणे म्हणजे स्त्री सशक्तीकरण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सामाजिक क्षेत्रातील घटनांमध्ये कारणांचा अभ्यास करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना आणि कठोर कारवाईची गरज व्यक्त केली.अर्जुन पुरस्कार मिळवलेल्या दिव्यानीचे कौतुक करताना, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी तिच्या पाठीशी उभे राहावे आणि महिला शक्तीचा गौरव करावा, असे आवाहन त्यांनी केले. पुण्यातील ११ वर्षीय मुलाच्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या घटनेबद्दल त्यांनी शोक व्यक्त करत महापालिकेने अधिक सतर्क राहून तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.

Related Video