
Amit Thackeray
मनसे युवा अध्यक्ष अमित ठाकरे यांनी ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेच्या नियमाच्या अंमलबजावणीबाबत सरकारकडून स्पष्ट माहितीची मागणी केली. अनेक वर्षांपासून शहरात राहूनही मराठी न शिकलेल्या चालकांना तीन महिन्यांची मुदत दिल्यानंतर हा नियम प्रत्यक्षात कसा लागू केला जाणार, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.प्रवाशाला एखाद्या चालकाला मराठी येत नसल्याचे आढळल्यास त्याची तक्रार नेमकी कुठे आणि कशी करायची, यासाठी स्पष्ट व्यवस्था असावी, असे अमित ठाकरे म्हणाले. चालकांचा परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया आणि त्यांना मराठी शिकण्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांचीही स्पष्ट माहिती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमादरम्यान त्यांनी मंचावरील गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. पक्षाची सदस्य नोंदणी सुरू असल्याचे सांगत सर्वांना भेटता न आल्याबद्दल खंत व्यक्त केली आणि कॉलेजमध्ये पुन्हा येऊन समस्या जाणून घेण्याचे आश्वासनही दिले.