आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात; आम्ही तुमच्यासोबत

Share this Video

मुंबईतील शिवाजी पार्क येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले. आंदोलकांना संबोधित करत त्यांनी हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून देशातील विद्यार्थ्यांचे असल्याचे सांगितले.सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा उल्लेख करत त्यांनी उपोषण संपले असले तरी आंदोलन संपलेले नसल्याचे स्पष्ट केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नसल्याचे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांना निर्भयपणे आपले मत मांडण्याचे आवाहन करत आंदोलनासाठी व्यासपीठ उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांच्या धैर्याचे कौतुक करत संविधान, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले.

Related Video