अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया

Share this Video

महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. रायगडमध्ये विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या शिष्यवृत्ती उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले, तर राज्यातील महिला व विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या योजनांवरही प्रकाश टाकला.नाशिकमधील महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पोलीस प्रशासन कठोर कारवाई करेल, असे स्पष्ट केले. तसेच पीडित महिलांचे व्हिडिओ शेअर न करण्याचे आवाहन करत, त्यांच्या न्यायासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबतही त्यांनी भूमिका मांडली. या प्रकरणात सखोल तपास होऊन सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दर्शवला.तसेच KYC प्रक्रियेबाबत महिलांना दिलासा देत 30 एप्रिलपर्यंत मुदत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Video