Abhijit Dipke

Share this Video

पुण्यात MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले CJP प्रमुख अभिजीत दिपके यांनी मुंबईत CJP विरोधात दाखल झालेल्या प्रकरणांवर प्रतिक्रिया दिली. कितीही केस दाखल करा किंवा जेलमध्ये टाका, देशातील लोकशाही आणि मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी लढत राहू आणि पुन्हा रस्त्यावर उतरू, असे दिपके म्हणाले. महाराष्ट्रात जवळपास 20 लाख MPSC विद्यार्थी असून वारंवार होणाऱ्या पेपर लीकमुळे त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह असल्याचे त्यांनी म्हटले. भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला CJPचा पूर्ण पाठिंबा असून राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. युवकांनीच परिवर्तन घडवावे लागेल, कारण हा त्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याचे दिपके म्हणाले. निवडणूक बहिष्काराबाबत विचारलेल्या प्रश्नावर, ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत आणि निवडणुका निष्पक्ष होत नाहीत तोपर्यंत अशा निवडणुकांत सहभागी होण्यात अर्थ नसल्याचे दिपके यांनी म्हटले. SIR फ्रीज झाल्यानंतर भाजप प्रत्यक्षात किती जागा जिंकते हे कळेल, असा दावाही त्यांनी केला.

Related Video