
आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण घोटाळ्याचा केला आरोप, अपात्र लाभार्थ्यांवर सवाल
लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. याशिवाय शेतकरी कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर आणि शिवसेनेच्या राजकीय घडामोडींवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.