
आदित्य ठाकरे : महापौर बंगल्यावर ₹5.5 कोटी खर्चावर सवाल
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या जागा खासगी बिल्डर आणि कंत्राटदारांच्या ताब्यात जाण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. या विरोधात शिवसेना (UBT) मुंबईत महामोर्चा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली.यावेळी त्यांनी महापौर बंगल्याच्या दुरुस्तीवर होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबईकरांच्या कराच्या पैशातून बंगला आणि गाड्यांवर खर्च होत असताना, जुहू चौपाटीची स्वच्छता, कचरा, बीएसटी, रस्ते, खड्डे आणि इतर मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कंत्राटदार आणि बिल्डरांच्या हिताचे सरकार असल्याची टीकाही केली.याशिवाय निवासी डॉक्टरांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्था, Gen Z, संसद, राम मंदिर देणगी, सिद्धिविनायक प्रकरण, जुऊ चौपाटी स्वच्छता आणि इतर विविध विषयांवरही आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.