आदित्य ठाकरे FIR झालेल्या आंदोलनकर्त्यांना कायदेशीर मदत देणार

Share this Video

दिल्लीतील जंतरमंतर येथे सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि विद्यार्थ्यांच्या CJP आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचा आदित्य ठाकरे यांनी निषेध केला. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधूर आणि ताब्यात घेण्याच्या कारवाईवर त्यांनी टीका केली.मुंबईसह महाराष्ट्रात आंदोलनादरम्यान ज्यांच्यावर FIR किंवा नोटीस दाखल होईल, त्यांना शिवसेना (UBT) मोफत कायदेशीर मदत देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यासाठी पक्षाने विशेष ई-मेल आयडी सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली. देशभरातील वकिलांनीही अशा विद्यार्थ्यांची प्रकरणे विनामूल्य लढावीत, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आंदोलनात बाहेरील प्रवृत्ती घुसल्याच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला. तसेच विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणे चुकीचे असल्याचे सांगत भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Video