Aaditya Thackeray

Share this Video

रायगडच्या कर्जतमधील साई डोंगर परिसरात टोरेंट वीज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीची आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पाहणी केली. विकासाला विरोध नाही, मात्र जंगल आणि आदिवासी पाडे उद्ध्वस्त करून प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. ९० हजार झाडे लावण्याच्या सरकारी दाव्यावर प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना खुल्या जनसुनावणीचे आव्हान दिले. वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्रद्रोही म्हटल्याबद्दल त्यांनी फडणवीसांवर टीका केली. संजय राऊत यांनीही आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत प्रकल्पाशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत आरोप केले.

Related Video