मानखुर्दमध्ये इमारत कोसळली, 6 जणांनी गमावला जीव

Share this Video

मुंबईतील मानखुर्द परिसरातील मंडला भागात मोठी दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळल्याने 6 जणांनी आपला जीव गमावला असून 1 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मलब्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परिसर सुरक्षित करण्यात आला असून दुर्घटनेच्या कारणांचा तपासही सुरू करण्यात आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video