MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Vijay Deverakonda Rashmika Mandanna : विजय आणि रश्मिकाने खरेदी केला नवा लक्झरी व्हिला?

Vijay Deverakonda Rashmika Mandanna : विजय आणि रश्मिकाने खरेदी केला नवा लक्झरी व्हिला?

विजय आणि रश्मिका लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे. या लोकप्रिय जोडीने शमशाबाद एअरपोर्टजवळ एक लक्झरी व्हिला बुक केल्याचं समजतंय.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 03 2026, 04:55 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना
Image Credit : Asianet News

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना सध्या हैदराबादच्या जुबली हिल्स येथील विजयच्या मोठ्या बंगल्यात राहतात. 'अर्जुन रेड्डी' हिट झाल्यानंतर विजयने हे घर घेतलं होतं. तो तिथे आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. पण लग्नानंतर ही जोडी शमशाबाद एअरपोर्टजवळच्या नव्या घरात राहायला जाणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
१००० चौरस वार (स्क्वेअर यार्ड) जागेत व्हिला
Image Credit : Instagram

१००० चौरस वार (स्क्वेअर यार्ड) जागेत व्हिला

शमशाबाद परिसरातील एका मोठ्या लक्झरी प्रोजेक्टमध्ये विजय आणि रश्मिकाने व्हिला बुक केल्याची बातमी आहे. जवळपास १००० चौरस वार (स्क्वेअर यार्ड) जागेत हा व्हिला असून, यात मागे मोकळी जागा आणि प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे. या प्रोजेक्टच्या आजूबाजूला डोंगर असून तिथे कृत्रिम धबधबा आणि पाण्याचे कालवेही तयार करण्यात आले आहेत.

Related Articles

Related image1
Dino Morea : मिठी नदी घोटाळा प्रकरणात डिनो मोरियाला अटक, अभिनेता EOW च्या जाळ्यात
35
लक्झरी व्हिलाची किंमत किती?
Image Credit : Asianet News

लक्झरी व्हिलाची किंमत किती?

या लक्झरी व्हिलाची किंमत १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं समजतंय. इथल्या दोन व्हिलांमध्ये बरंच अंतर ठेवण्यात आलंय, जेणेकरून राहणाऱ्यांना पूर्ण प्रायव्हसी मिळेल. विजय आणि रश्मिकाने इथे घर घेतल्याची चर्चा सुरू झाली असली, तरी दोघांकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

45
सोशल मीडियावर चर्चा
Image Credit : Asianet News

सोशल मीडियावर चर्चा

विजय आणि रश्मिकाच्या या नव्या घराच्या बातमीने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेषतः लग्नानंतर दोघे नव्या घरात जाणार असल्याच्या बातमीने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. पण जोपर्यंत अधिकृत माहिती समोर येत नाही, तोपर्यंत या फक्त चर्चाच आहेत.

55
आगामी सिनेमा
Image Credit : Instagram

आगामी सिनेमा

सध्या विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना त्यांच्या आगामी 'रणबाली' चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. राहुल सांकृत्यान दिग्दर्शित हा चित्रपट १६ ऑक्टोबरला थिएटरमध्ये धडकणार आहे. लग्नानंतर विजय आणि रश्मिकाचा एकत्र येणारा हा पहिलाच चित्रपट असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Drishyam 3 Box Office: दृश्यम ३ ची बंपर कमाई, पहिल्याच दिवशी गल्ला ९५ कोटींच्या पार
Recommended image2
Captain Smit Machchhar: फ्लाईदुबईच्या 'हिरो' पायलटचं शाहरुख-सलमानकडून कौतुक
Recommended image3
Drishyam 3 Box Office : दृश्यम 3 ने पहिल्याच दिवशी केली बंपर कमाई, आकडे समोर
Recommended image4
Salman Khan : 'तुझ्यासोबत उड्डाण करायला नक्की आवडेल', सलमान खानने केलं पायलटचं कौतुक
Recommended image5
Dino Morea Arrest: ८ तासांच्या चौकशीनंतर प्रसिद्ध अभिनेता डिनो मोरियाला अटक!
Related Stories
Recommended image1
Dino Morea : मिठी नदी घोटाळा प्रकरणात डिनो मोरियाला अटक, अभिनेता EOW च्या जाळ्यात
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved