- Home
- Entertainment
- महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत ही हिरोईन करणार लग्न, या 6 हिरोंसोबत होती रिलेशनशिपमध्ये!
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत ही हिरोईन करणार लग्न, या 6 हिरोंसोबत होती रिलेशनशिपमध्ये!
Tara Sutaria Dating History : तारा सुतारिया सध्या वीर पहाडियासोबतच्या डेटिंगच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. दिवाळी पूर्वीच त्यांनी रिलेशनशिपची कबुली दिली आहे. पण यापूर्वीही ती रिलेशनशिपमध्ये होती. वीरच्या आधी तिचं मन कोणत्या सेलिब्रिटींवर आलं होतं.

वीर पहाडिया
सध्या तारा सुतारियाचं नाव वीर पहाडियासोबत जोडलं जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं जातं. त्यामुळे चाहते त्यांना लवकरच लग्नबंधनात पाहू इच्छित आहेत. वीर हे सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत.
ईशान खट्टर
एकेकाळी तारा सुतारियाचं नाव बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टरसोबतही जोडलं गेलं होतं. मात्र, दोघांनीही कधीच आपल्या नात्याला दुजोरा दिला नाही.
रोहन मेहरा
रिपोर्ट्सनुसार, ईशान खट्टरपासून वेगळं झाल्यानंतर तारा सुतारिया रोहन मेहराला डेट करू लागली होती. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं जायचं. पण, त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही.
सिद्धार्थ मल्होत्रा
'मरजावां'च्या शूटिंगदरम्यान ताराचं मन सिद्धार्थ मल्होत्रावरही जडलं होतं. पण, सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोघांनी एकमेकांपासून अंतर ठेवलं.
अहान शेट्टी
'तडप' सिनेमात काम करताना तारा सुतारिया अहान शेट्टीच्या जवळ आली होती. मात्र, तिने या चर्चांवर कधीही मौन सोडलं नाही.
आदर जैन
'स्टुडंट ऑफ द इयर 2' रिलीज झाल्यानंतर तारा सुतारिया आदर जैनला डेट करू लागली होती. पण, काही काळानंतर ते वेगळे झाले.