Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीतील राकेशच्या खेळाला एक्स पत्नीचा पाठिंबा । Riddhi Dogra

Share this Video

अभिनेता राकेश बापट सध्या Bigg Boss Marathi Season 6 मध्ये सहभागी झाला असून, त्याच्या खेळाची चर्चा रंगली आहे. टास्कदरम्यान राकेश आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतो, त्यामुळे अनेक प्रेक्षक त्याच्या खेळाचं कौतुक करत आहेत.दरम्यान, राकेश बापटची एक्स पत्नी रिद्धी डोगरा हिनेही त्याच्या खेळाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवरील ‘Ask Me’ सेशन दरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रिद्धी म्हणाली की, “मला राकेशचा अभिमान आहे. तो खूप चांगला खेळतोय आणि केलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतोय.”अशाच Bigg Boss Marathi Updates, Celebrity News, Entertainment Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

Related Video