
तमिळनाडू: रजनीकांतचा ‘कुली’ आज प्रदर्शित; चाहत्यांचा ढोल-ताशा आणि नृत्य करत जल्लोष
सुपरस्टार रजनीकांतचा बहुप्रतिक्षित कुली चित्रपट आज प्रदर्शित झाला. तमिळनाडूत चाहत्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, नृत्य करत आणि फटाके उडवत जल्लोष केला. थिएटरबाहेर रजनीकांतचे कटआउट्स, बॅनर्स आणि फॅन क्लबच्या अनोख्या उत्सवाने वातावरण रंगून गेले होते.