MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Nana Patekar Net Worth : 35 रुपयांच्या कमाईपासून 80 कोटींची संपत्ती; पण नाना पाटेकर आयुष्य साधेपणाने जगले

Nana Patekar Net Worth : 35 रुपयांच्या कमाईपासून 80 कोटींची संपत्ती; पण नाना पाटेकर आयुष्य साधेपणाने जगले

Nana Patekar Net Worth : फक्त ३५ रुपये महिन्याच्या कमाईपासून करिअरची सुरुवात करणारे आणि ८० कोटींची संपत्ती उभी करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (७५) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांचा इथवरचा सिनेसृष्टीतील प्रवास आणि संपत्ती….

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 08 2026, 04:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकरांचं निधन   मागे किती संपत्ती सोडली?
Image Credit : x

हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकरांचं निधन - मागे किती संपत्ती सोडली?

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (७५) यांचं मंगळवारी सकाळी निधन झालं. गोव्यातील दोना पावला येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ५:२० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. माहिती मिळताच डॉक्टरांच्या टीमने सुमारे ४५ मिनिटे सीपीआर (CPR) देऊन त्यांचे प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्यांना यश आलं नाही.

मणिपाल हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची मेडिको-लीगल केस नोंदवण्यात आली आहे. मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टी आणि कोट्यवधी चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
वयाच्या १३ व्या वर्षी ३५ रुपयांच्या कमाईतून सुरू झाला प्रवास
Image Credit : X

वयाच्या १३ व्या वर्षी ३५ रुपयांच्या कमाईतून सुरू झाला प्रवास

नाना पाटेकर यांच्या करिअरची सुरुवात अजिबात सोपी नव्हती. लहान वयातच त्यांनी खूप आर्थिक अडचणींचा सामना केला. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. ते रोज मुंबईतील चुनाभट्टी भागात सुमारे ८ किलोमीटर पायी चालत जायचे. तिथे ते सिनेमाचे पोस्टर रंगवण्याचं काम करायचे. त्या दिवसांत त्यांची महिन्याची कमाई फक्त ३५ रुपये होती आणि सोबत एका वेळचं जेवण मिळायचं. "खिशात पैसे नसतील तर समाज तुमच्याकडे एक ओझं म्हणून पाहतो," अशी खंत नानांनी १९९८ मध्ये एका मुलाखतीत बोलून दाखवली होती. याच संघर्षाच्या दिवसांनी त्यांना एक अभिनेता म्हणून अधिक मजबूत बनवलं.

Related Articles

Related image1
Nana Patekar House : भपकेबाज सजावटीपेक्षा साधेपणाला महत्त्व, नाना पाटेकरांचं घर आणि पुण्यातलं फार्महाऊस
Related image2
Nana Patekar Death : रात्री अडीचला मेसेज, पहाटे 4 ला श्वास घ्यायला त्रास; नाना पाटेकरांच्या शेवटच्या क्षणी काय घडलं?
36
रंगभूमी ते रुपेरी पडदा - सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते
Image Credit : X

रंगभूमी ते रुपेरी पडदा - सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते

रंगभूमीवरून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या नाना पाटेकर यांनी 'गमन' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर 'अंकुश', 'परिंदा' यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'क्रांतिवीर' सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

46
एका सिनेमासाठी घ्यायचे सव्वा कोटी रुपये
Image Credit : Meta AI

एका सिनेमासाठी घ्यायचे सव्वा कोटी रुपये

'अग्निसाक्षी', 'खामोशी', 'अब तक छप्पन', 'वेलकम' या सिनेमांमधून नानांनी एक अष्टपैलू अभिनेता म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. १९९० च्या दशकात त्यांची डिमांड प्रचंड वाढली होती. 'अग्निसाक्षी'च्या यशानंतर ते एका सिनेमासाठी १.२५ कोटी रुपये मानधन घेऊ लागले. त्या काळात अमिताभ बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते म्हणून नाना पाटेकर ओळखले जायचे.

56
८० कोटींची संपत्ती.. पण राहणीमान एकदम साधं
Image Credit : AI Image

८० कोटींची संपत्ती.. पण राहणीमान एकदम साधं

रिपोर्ट्सनुसार, नाना पाटेकर यांची एकूण संपत्ती सुमारे ८० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. नंतरच्या काळात ते एका सिनेमासाठी २ ते ३ कोटी रुपये मानधन घ्यायचे. काही सिनेमांच्या नफ्यातही त्यांचा वाटा असायचा. पण कोट्यवधींची संपत्ती असूनही त्यांची जीवनशैली अतिशय साधी होती.

मुंबईतील अंधेरी भागात त्यांचा ७५० स्क्वेअर फुटांचा फ्लॅट आहे. त्याची सध्याची किंमत ३ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. याशिवाय पुण्याजवळील खडकवासला येथे त्यांचं २७ एकरांचं फार्महाऊस आहे. तिथे ते स्वतः शेती करायचे. त्यांच्या गॅरेजमध्ये महिंद्रा जीप, ऑडी Q5/Q7, बीएमडब्ल्यू X6 यांसारख्या आलिशान गाड्याही आहेत.

66
'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून समाजकार्य
Image Credit : Asianet News

'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून समाजकार्य

नाना पाटेकर केवळ एक उत्तम अभिनेतेच नव्हते, तर ते एका मोठ्या मनाचे माणूस म्हणूनही ओळखले जायचे. त्यांनी आपल्या कमाईचा मोठा हिस्सा समाजसेवेसाठी खर्च केला. महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांनी २०१५ मध्ये प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून 'नाम फाउंडेशन' (NAAM Foundation) ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जलसंधारणाचे प्रकल्प राबवले, तलाव बांधले आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केली.

एकदा १.५ कोटी रुपयांची आलिशान कार घेण्याऐवजी त्यांनी ते पैसे अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांना वाटले होते, अशी आठवण लेखक रणबीर पुष्प यांनी सांगितली आहे. तसेच 'पाठशाला' सिनेमासाठी मानधन न घेता त्यांनी ती रक्कम थेट एनजीओच्या (NGO) नावे केली होती. ३५ रुपयांच्या कमाईपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास कोट्यवधींच्या संपत्तीपर्यंत पोहोचला, पण त्यांनी केलेल्या समाजकार्यामुळेच ते लोकांच्या मनात कायम जिवंत राहतील.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
मनोरंजन बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Anirudh Kavya Wedding: अनिरुद्ध-काव्याच्या रिसेप्शनला स्टॅलिन, रजनीकांत यांच्यासोबत विजय; सन ग्रुपने शेअर केला फोटो
Recommended image2
Chennai Wedding: अनिरुद्ध आणि काव्या मारन यांचे चेन्नईत ग्रँड रिसेप्शन, दिग्गजांची हजेरी
Recommended image3
Neha Jetley Ye Ankahe Alfaaz: नेहा जेटलीची बाप्पा लाहिरीसोबत धमाकेदार एंट्री
Recommended image4
Now Playing
Marathi cinema गुजराथी मुलीने मराठी सिनेमासाठी हे काय दाखवलं Aadi Anant
Recommended image5
Batman Trend: माधुरी दीक्षितच्या 'साजन साजन' गाण्यावर बॅटमॅन का ट्रेंड होतोय? पाहा भन्नाट कनेक्शन
Related Stories
Recommended image1
Nana Patekar House : भपकेबाज सजावटीपेक्षा साधेपणाला महत्त्व, नाना पाटेकरांचं घर आणि पुण्यातलं फार्महाऊस
Recommended image2
Nana Patekar Death : रात्री अडीचला मेसेज, पहाटे 4 ला श्वास घ्यायला त्रास; नाना पाटेकरांच्या शेवटच्या क्षणी काय घडलं?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved