MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Nana Patekar Fitness : 56व्या वर्षापर्यंत दिवसाला 60 सिगारेट ओढणारे नाना पाटेकर नंतर फिट कसे झाले?

Nana Patekar Fitness : 56व्या वर्षापर्यंत दिवसाला 60 सिगारेट ओढणारे नाना पाटेकर नंतर फिट कसे झाले?

एकेकाळी दिवसाला तब्बल ६० सिगारेट ओढणाऱ्या नाना पाटेकरांनी वयाच्या ५६ व्या वर्षी हे व्यसन पूर्णपणे सोडलं. व्यायाम, शिस्त, साधं जीवन आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देणारा त्यांचा फिटनेस प्रवास आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 09 2026, 01:01 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
फिट नाना पाटेकर
Image Credit : Social media

फिट नाना पाटेकर

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झाल्याच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ७५ वर्षीय नाना पाटेकरांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि वेगळ्या स्टाईलने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अलीकडेच त्यांचा एक वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या वयातही त्यांचा फिटनेस पाहून चाहते थक्क झाले होते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
8 ऑक्टोबरला निधन
Image Credit : X

8 ऑक्टोबरला निधन

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना आज सकाळी ५:२० च्या सुमारास तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सलग ४५ मिनिटे सीपीआर (CPR) दिला. पण त्यांचे प्राण वाचवण्यात यश आलं नाही. मणिपाल रुग्णालयातील ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाने या प्रकरणात मेडिको-लीगल केस (MLC) देखील नोंदवली होती.

Related Articles

Related image1
Nana Patekar Funeral : नाना पाटेकर यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार का झाले? मुलगा मल्हारने सांगितलं कारण
Related image2
Cardiac Arrest Symptoms : नाना पाटेकर यांचं निधन; कार्डियाक अरेस्टची ही लक्षणं वेळीच ओळखा
36
फिटनेसला सर्वाधिक प्राधान्य
Image Credit : X

फिटनेसला सर्वाधिक प्राधान्य

नाना पाटेकर नेहमीच त्यांच्या फिटनेस आणि दैनंदिन जीवनशैलीला खूप महत्त्व द्यायचे. ते रोज दीड ते दोन तास शारीरिक व्यायामासाठी वेळ काढायचे. त्यांचं वर्कआउट फक्त जिमपुरतं मर्यादित नव्हतं. त्यात सूर्यनमस्कारासारख्या पारंपारिक व्यायामाचाही समावेश होता. आयुष्याच्या या टप्प्यावरही त्यांनी आपलं शरीर उत्तम स्थितीत ठेवलं होतं.

46
५६ व्या वर्षापर्यंत दिवसाला ६० सिगारेट
Image Credit : ANI

५६ व्या वर्षापर्यंत दिवसाला ६० सिगारेट

पण नाना पाटेकरांचं आयुष्य सुरुवातीपासून इतकं शिस्तबद्ध नव्हतं. २०१५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सिगारेट ओढण्याच्या जुन्या सवयीबद्दल सांगितलं होतं. एकेकाळी आपण दिवसाला तब्बल ६० सिगारेट ओढायचो, असा खुलासा त्यांनी केला होता. त्यांची ही सवय वयाच्या ५६ व्या वर्षापर्यंत तशीच होती.

56
एका भावनिक घटनेने त्यांचं आयुष्य बदललं
Image Credit : Nana Patekar - नाना पाटेकर/ Facebook

एका भावनिक घटनेने त्यांचं आयुष्य बदललं

नाना पाटेकरांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या एका जवळच्या कौटुंबिक मैत्रिणीने आपला मुलगा गमावला होता. त्या महिलेचं अफाट दुःख पाहून नाना खूप अस्वस्थ झाले होते. एकदा नाना खोकत असताना, त्या महिलेने त्यांना विचारलं की, 'मी अजून किती दुःख सहन करू?' या एका वाक्याचा नानांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला. या घटनेनंतर त्यांनी सिगारेट कायमची सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ते कधीच त्या व्यसनाकडे वळले नाहीत.

66
फिटनेससोबतच मानसिक आरोग्यालाही प्राधान्य
Image Credit : X

फिटनेससोबतच मानसिक आरोग्यालाही प्राधान्य

नाना पाटेकरांच्या जीवनशैलीत फिटनेससोबतच मानसिक आरोग्य, साधेपणा आणि शिस्तीला खूप महत्त्व होतं. सिगारेटसारखं जुनं व्यसन सोडून त्यांनी व्यायाम आणि साध्या राहणीमानावर जास्त लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांच्या आयुष्यातील हा बदल हे सिद्ध करतो की, कोणत्याही वयात वाईट सवयी सोडून आपण निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करू शकतो.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Nana Patekar Funeral : नाना पाटेकर यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार का झाले? मुलगा मल्हारने सांगितलं कारण
Recommended image2
Nana Patekar Death : नाना पाटेकर आपल्या कार्यातून कायम अमर राहतील, मुलगा मल्हारची भावूक प्रतिक्रिया
Recommended image3
Nisha Raphael POCSO Case: ११ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार? इन्फ्लुएन्सर निशा राफेलवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
Recommended image4
Nana Patekar: 'ती भूमिका माझा जीव घेईल', नानांनी आधीच वर्तवली होती का स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी?
Related Stories
Recommended image1
Nana Patekar Funeral : नाना पाटेकर यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार का झाले? मुलगा मल्हारने सांगितलं कारण
Recommended image2
Cardiac Arrest Symptoms : नाना पाटेकर यांचं निधन; कार्डियाक अरेस्टची ही लक्षणं वेळीच ओळखा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved