Saif Ali Khan Birthday : अभिनेत्री करीना कपूर खानने तिचा नवरा सैफ अली खानच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त एक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यात तिने सैफला 'कायमचा साथीदार' म्हटलंय.
मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खानने तिचा नवरा आणि अभिनेता सैफ अली खानच्या ५६व्या वाढदिवशी एक खास सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. करीनाने सैफसोबतचे काही खासगी फोटो शेअर करत त्याला "माझा कायमचा साथीदार" (forever ride or die) असं म्हटलं आहे. या पोस्टमधून चाहत्यांना त्यांच्या लाईमलाईटपासून दूर असलेल्या कौटुंबिक आयुष्याची एक छान झलक पाहायला मिळाली आहे.
बेबोने सैफसोबतचे अनेक फोटो शेअर केले, ज्यात त्यांचे व्हॅकेशन आणि ट्रीप्समधील काही क्षण होते. विशेष म्हणजे, हे सर्व फोटो सैफच्या परवानगीनेच शेअर केल्याचंही करीनाने आवर्जून सांगितलं. या फोटोंमधून हे जोडपं प्रवासादरम्यान एकत्र घालवलेल्या वेळेचा आनंद घेताना दिसतंय.
या फोटोंसोबतच करीनाने सैफसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही लिहिलं आहे. 'तू नसतास तर आयुष्य किती कंटाळवाणं झालं असतं', असंही तिने म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवर ही बर्थडे पोस्ट शेअर करताना करीनाने लिहिलं, "Happy Birthday to my forever ride or die...how boring would life be without you... This insta post pictures are all approved by him loves it when I post his pictures"
करीना आणि सैफने २०१२ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत. करीनाने शेअर केलेल्या फोटोंमधून त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून एकत्र घालवलेल्या कौटुंबिक क्षणांची झलक दिसते.
सैफचा आगामी सिनेमा
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, सैफ अली खान लवकरच 'हैवान' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. तसंच, बोमन इराणी, सैयामी खेर आणि श्रिया पिळगावकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती KVN प्रॉडक्शन्स आणि थेस्पियन फिल्म्सच्या बॅनरखाली वेंकट के. नारायण आणि शैलजा देसाई फेन यांनी केली आहे. 'हैवान' हा सिनेमा ११ सप्टेंबर, २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


