MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Kantara Chapter 1 Day 1 Box Office Collection : कांताराने कुली, छावासह या चित्रपटांना टाकले मागे, एवढ्या कोटींची केली कमाई!

Kantara Chapter 1 Day 1 Box Office Collection : कांताराने कुली, छावासह या चित्रपटांना टाकले मागे, एवढ्या कोटींची केली कमाई!

Kantara Chapter 1 Day 1 Box Office Collection : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे. कांताराने रजनीकांत यांचा कुली आणि ब्लॉकबस्टर छाया या चित्रपटांना मागे टाकले आहे.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Oct 03 2025, 09:04 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' ची पहिल्या दिवसाची कमाई
Image Credit : Film

'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' ची पहिल्या दिवसाची कमाई

ट्रेड ट्रॅकिंग वेबसाइट sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी 'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' ने जवळपास 60 कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमधून झाली आहे. तर ACNILC च्या अहवालानुसार, 'कांतारा: चॅप्टर 1' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 65.3 कोटींची कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या कुलीने पहिल्या दिवशी 65 कोटींची कमाई केली होती.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
मोठ्या चित्रपटांना टाकले मागे
Image Credit : Film

मोठ्या चित्रपटांना टाकले मागे

'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' ने पहिल्याच दिवशी 'कांतारा' या पहिल्या भागाच्या आठवड्याभराच्या कमाईला जवळपास दुप्पट फरकाने मागे टाकले आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा'ने पहिल्या दिवशी फक्त 1.95 कोटी रुपये कमावले होते, तर त्याच्या पहिल्या आठवड्याची कमाई 30.3 कोटी रुपये होती. या वर्षीचे ब्लॉकबस्टर चित्रपट 'सैयारा' 22 कोटी, 'सिकंदर' 26 कोटी आणि 'छावा' 31 कोटीच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला 'कांतारा: चॅप्टर 1'ने मागे टाकलं आहे.

Related Articles

Related image1
TCS Pune layoff : पुण्यातून 2500 कर्मचाऱ्यांची कपात, टीसीएसने काय म्हटले? NITES चे दावे काय? फडणविसांना का पत्र लिहिले?
Related image2
Horoscope 3 October : आज शुक्रवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांसाठी नोकरीत बढतीचे आणि व्यापारात प्रगतीचे योग!
35
2025 चा दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला 'कांतारा चॅप्टर 1'
Image Credit : Film

2025 चा दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला 'कांतारा चॅप्टर 1'

'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' हा 2025 मधील चौथा चित्रपट ठरला आहे, ज्याने पहिल्या दिवशी भारतात 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याआधी 'दे कॉल हिम OG', 'वॉर 2' आणि 'गेम चेंजर' या तीनच चित्रपटांनी अशी कामगिरी केली होती. त्यांची पहिल्या दिवसाची कमाई अनुक्रमे 63.75 कोटी, 52 कोटी आणि 51 कोटी रुपये होती. हा 'दे कॉल हिम OG' नंतर या वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे.

45
'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' चे बजेट किती आहे?
Image Credit : Film

'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' चे बजेट किती आहे?

रिपोर्ट्सनुसार, 'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' ची निर्मिती सुमारे 125 कोटी रुपयांमध्ये झाली आहे. यानुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 50 टक्के बजेट वसूल केले आहे. 'पुष्पा' (फ्रँचायझी) आणि 'महावतार नरसिंह' सारख्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या प्रसिद्ध 'होम्बळे फिल्म्स'ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

55
'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' ची स्टार कास्ट
Image Credit : Film

'कांतारा अ लीजेंड चॅप्टर 1' ची स्टार कास्ट

ऋषभ शेट्टीने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून तोच मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय रुक्मिणी वसंत, गुलशन देवय्या, जयराम, प्रमोद शेट्टी, प्रकाश थुमिनाद आणि दीपक राय पनाजे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
मनोरंजन बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Bollywood Actors Threat Case : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने आयुष्मान-तुषारला धमकी! बंगळुरूतून आयटी इंजिनिअरला अटक
Recommended image2
Ramayana Box Office Prediction : रणबीर कपूरचा 'रामायण' ३००० कोटी कमवणार?
Recommended image3
22 Frames Casting Agency: '22 फ्रेम्स'ची कास्टिंग क्षेत्रात एन्ट्री; उन्नी मुकुंदनच्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटासोबत सुरुवात
Recommended image4
Anurag Kashyap: अनुराग कश्यपच्या अडचणी वाढल्या, सुरत कोर्टाकडून जामीनपात्र वॉरंट जारी
Recommended image5
Bigg Boss Telugu 10: बिग बॉस तेलुगू १०: राम प्रसाद आणि वर्षिणी सेफ, डेंजर झोनमध्ये कोण?
Related Stories
Recommended image1
TCS Pune layoff : पुण्यातून 2500 कर्मचाऱ्यांची कपात, टीसीएसने काय म्हटले? NITES चे दावे काय? फडणविसांना का पत्र लिहिले?
Recommended image2
Horoscope 3 October : आज शुक्रवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांसाठी नोकरीत बढतीचे आणि व्यापारात प्रगतीचे योग!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved