अजय देवगणच्या 'दृश्यम ३' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कोटींची कोटींची कमाई केली आहे.
मुंबई : बॉलिवूडचे चाहते 'दृश्यम ३' (दृश्यम द कन्क्लूजन) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. मोहनलाल यांच्या मल्याळम 'दृश्यम ३' च्या रिलीजनंतर चार महिन्यांनी हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होतंय की या भागाने त्यांना अजिबात निराश केलेलं नाही. चित्रपटातील अभिनय आणि मेकिंगमध्ये एक वेगळेपण पाहायला मिळत असल्याचं प्रेक्षक सांगत आहेत. चित्रपटाचा शेवट अतिशय जबरदस्त करण्यात आला आहे. 'दृश्यम ३' ने पहिल्याच दिवशी जगभरात तब्बल ९५.१० कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाला ५ पैकी ४.५ स्टार्स दिले आहेत. तसेच त्यांनी 'दृश्यम ३' ला "शुअर-शॉट ब्लॉकबस्टर" असं म्हटलं आहे. एका प्रेक्षकाने प्रतिक्रिया देताना म्हटलंय, "हा एक परफेक्ट चित्रपट आहे. मल्याळमपेक्षा हिंदीत त्यांनी हा चित्रपट अधिक चांगल्या प्रकारे बनवला आहे. 'दृश्यम' हे नाव या चित्रपटासाठी एकदम योग्य असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चित्रपटातील सर्वच ट्विस्ट भारी आहेत. जर हीच कथा मोहनलाल (लालेट्टन) यांना घेऊन मल्याळममध्ये केली असती, तर तो चित्रपट वेगळ्याच लेव्हलवर गेला असता. मोहनलाल यांचा दमदार अभिनयही पाहायला मिळाला असता."
ट्विटरवर आणखी एका प्रेक्षकाने लिहिलंय, "सुरुवातीपासून शेवटपर्यंत 'दृश्यम ३' एक जबरदस्त थ्रिलिंग अनुभव देतो. मल्याळम व्हर्जनपेक्षा हा चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने तयार केला आहे. उत्तम पटकथा, बॅकग्राउंड म्युझिक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे चित्रपट एकदम कडक झाला आहे. या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे, यातील ट्विस्ट तुम्ही अजिबात ओळखू शकत नाही." याशिवाय, जयदीप अहलावत याच्या अभिनयाचंही प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत.
मल्याळम ओरिजिनल कथेपेक्षा हिंदी रिमेकमध्ये काही बदल पाहायला मिळतील, असं दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. हिंदी प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन पटकथेत काही बदल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 'दृश्यम द कन्क्लूजन' या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, जयदीप अहलावत आणि श्रिया सरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

