- Home
- Entertainment
- धर्मेंद्र यांची 450 कोटींची संपत्ती, 2 बायका तर 2 मुले आणि 4 मुली, कुणाला किती संपत्ती मिळणार?
धर्मेंद्र यांची 450 कोटींची संपत्ती, 2 बायका तर 2 मुले आणि 4 मुली, कुणाला किती संपत्ती मिळणार?
Dharmendra Total Net Worth Assets property : अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. एका छोट्या गावातून येऊन बॉलिवूडचा सुपरहिरो बनलेल्या धर्मेंद्र यांनी संघर्षातून सुमारे ४५० कोटींची संपत्ती कमावली आहे.

धर्मेंद्र किती संपत्तीचे आहेत मालक
धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांनी अनेक दशके बॉलिवूडवर राज्य केले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
एका छोट्या गावातून येऊन झाला बॉलिवूडचा सुपरहिरो
एका छोट्या गावातून पुढं येऊन धर्मेंद्र हे सुपरहिरो झाले. एक काळ त्यांनी जीवनात असा पाहिला की त्यावेळी त्यांना जेवणासाठी खिशात पैसे नव्हते, पण आता संघर्ष करून ते इथपर्यंत पोहचले आहेत.
त्यांच्याकडे किती आहे संपत्ती?
धर्मेंद्र यांच्याकडे किती संपत्ती आहे ते आपण जाणून घेऊयात. ते जवळपास ४५० कोटींच्या संपत्तीचे मालक असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांचे जवळपास १०० कोटींचे फार्महाउस असून त्याची झलक ते सोशल मीडियावर दाखवत असतात.
मुंबई आणि लोणावळ्यात अनेक प्रॉपर्टी
मुंबई आणि लोणावळ्यात धर्मेंद्र यांच्या अनेक प्रॉपर्टी असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांच्याकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ सारख्या अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे. धर्मेंद्र यांचे जवळपास १४ एकरवर वसलेले एक रिसॉर्ट आहे.
धर्मेंद्र कोणासोबत राहायचे?
धर्मेंद्र हे त्यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यांच्यासोबत शेवटच्या काळात राहत नव्हते. ते त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत शेवटच्या काळात राहायचे. त्यांना एकूण ५ मुले असून सनी देओल हा सर्वात मोठा मुलगा आहे.
कोणाला किती हिस्सा मिळणार
धर्मेंद्र यांच्या ४५० कोटी रुपयांच्या संपत्तीत अनेक हस्सेदार असतील असे दिसून येत आहे. त्यांना दोन बायका आहेत. तर दोन मुलगे आणि चार मुली आहेत. पण सनी देओल, बॉबी देओल आणि दोन पत्नीला सर्वाधिक हिस्सा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. अजून त्यांची लिगल विश समोर आलेली नाही. त्यात त्यांनी संपत्तीची कशी वाटणी केली असेल हे बघण्यासारखे असेल.

