Bollywood Actor Dharmendra health : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या घरी सोमवारी ॲम्ब्युलन्स पोहोचल्याने त्यांच्या प्रकृतीची चिंता पुन्हा वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Bollywood Actor Dharmendra health : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची चिंता पुन्हा वाढली आहे, कारण सोमवारी त्यांच्या घरी ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटी जात आहेत. त्यांच्या तीन मुलीही निवासस्थानी पोहोचल्या आहेत. दरम्यान, धर्मेंद्र यांचे निधन झाले असल्याची माहिती करण जोहर याने सोशल मीडियावर दिली आहे. त्यामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

१२ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना १२ नोव्हेंबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने १० नोव्हेंबर रोजी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर, हेमा मालिनी यांनी पत्रकार सुभाष के. झा यांना सांगितले होते की, "हा काळ माझ्यासाठी अजिबात सोपा नव्हता. धर्मजींचे आरोग्य ही आमच्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे. त्यांची मुलेही रात्रभर जागी होती."

अभिनेत्री पुढे म्हणाली, "मी कमजोर होऊ शकत नाही, माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत, पण हो, ते घरी परतले याचा मला आनंद आहे. ते आता रुग्णालयातून बाहेर आले आहेत याचा आम्हाला सर्वांना दिलासा आहे. ते त्यांच्या माणसांमध्ये असावेत. बाकी देवाच्या हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा."

सनी देओल पापाराझींवर भडकला

गुरुवारी सकाळी सनी देओलला माध्यमांचा राग आला. सनीने हात जोडून छायाचित्रकार आणि पापाराझींना सांगितले - "तुमच्या घरीही आई-वडील आणि मुले आहेत, तुम्हाला लाज वाटत नाही का?" या दरम्यान, सनी देओलने काही अपशब्दही वापरले.