MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Bollywood Teachers : शिक्षक फक्त वर्गात नसतात; हे ५ सिनेमे देतात आयुष्याचा खरा धडा!

Bollywood Teachers : शिक्षक फक्त वर्गात नसतात; हे ५ सिनेमे देतात आयुष्याचा खरा धडा!

शिक्षक म्हणजे फक्त शाळेच्या चार भिंतीत शिकवणारी व्यक्ती नाही. आयुष्यात महत्त्वाचे धडे देणारी कोणतीही व्यक्ती गुरुच असते. शिक्षक दिनानिमित्त, बॉलिवूडच्या अशाच ५ सिनेमांवर एक नजर टाकूया, जे गुरु-शिष्य नात्याची एक वेगळीच बाजू दाखवतात.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 05 2026, 01:28 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
तारे जमीन पर
Image Credit : Asianet News

तारे जमीन पर

या यादीत पहिलं नाव येतं 'तारे जमीन पर' मधल्या राम शंकर निकुंभ या पात्राचं. डिस्लेक्सियाने त्रस्त असलेल्या इशान अवस्थी नावाच्या मुलामधला कलाकार ओळखून त्याला नवं आयुष्य देणाऱ्या शिक्षकाची भूमिका आमिर खानने अप्रतिम साकारली. एका शिक्षकाची खरी जबाबदारी काय असते, हे या सिनेमाने दाखवून दिलं.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
ब्लॅक
Image Credit : Asianet News

ब्लॅक

अशीच एक हृदयस्पर्शी कथा 'ब्लॅक' सिनेमाची आहे. यात अमिताभ बच्चन यांनी देवराज सहाय यांची भूमिका साकारली. ते मिशेल मॅकनॅली (राणी मुखर्जी) या अंध आणि कर्णबधिर मुलीच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. अंधारात हरवलेल्या तिच्या आयुष्याला अक्षरांची ओळख करून देणाऱ्या गुरुची ही कथा आहे.

Related Articles

Related image1
Rashmika Mandanna : रश्मिकाची मोठी झेप! दीपिकाला मागे टाकत बनली देशाची नंबर वन अभिनेत्री
Related image2
Khushi Kapoor New Home : खुशी कपूरची नवी गुंतवणूक, वांद्र्यात फक्त १८० sq ft चा फ्लॅट घेतला तब्बल ६३ लाखांना
35
चक दे इंडिया
Image Credit : Asianet News

चक दे इंडिया

शिक्षक फक्त वर्गातच नसतो, तो एक कोचसुद्धा असू शकतो. 'चक दे इंडिया' सिनेमात शाहरुख खानने साकारलेली कबीर खानची भूमिका याचंच उत्तम उदाहरण आहे. एक हॉकी कोच म्हणून तो आपल्या टीममधील खेळाडूंना फक्त खेळाचे डावपेच शिकवत नाही, तर त्यांच्यात देशभक्ती आणि एकतेची भावना जागवून त्यांना चॅम्पियन बनवतो.
45
३ इडियट्स
Image Credit : Asianet News

३ इडियट्स

शिक्षण व्यवस्थेला आव्हान देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या मार्गावर चालायला प्रेरणा देणाऱ्या गुरुची कथाही बॉलिवूडमध्ये आहे. '३ इडियट्स' सिनेमात आमिर खानच्या 'रँचो' या पात्राने आपल्या मित्रांना मार्कांपेक्षा ज्ञान महत्त्वाचं आहे आणि आपल्या पॅशनचा पाठलाग करा, हा गुरुमंत्र दिला. हे बॉलिवूडमधील एक अविस्मरणीय 'मित्र-गुरु' पात्र आहे.
55
डिअर जिंदगी
Image Credit : Asianet News

डिअर जिंदगी

आधुनिक काळातल्या गुरुची संकल्पना 'डिअर जिंदगी' या सिनेमात दिसते. यात शाहरुख खानने डॉ. जहांगीर खान या मानसोपचारतज्ञाची (थेरपिस्ट) भूमिका साकारली. तो कायराच्या (आलिया भट) मानसिक गोंधळावर उपाय शोधून तिला आयुष्य सुंदर असल्याची जाणीव करून देतो. एक थेरपिस्टसुद्धा कसा उत्तम गुरु होऊ शकतो, हे या सिनेमाने दाखवलं.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
मनोरंजन बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Honey Singh Nephew: हनी सिंगच्या पुतण्याचा जालंधरमध्ये भीषण अपघातात मृत्यू, कोण होता विदित ओलक?
Recommended image2
Kangana Ranaut: कंगना रनौत पुन्हा एकदा हॉरर सिनेमात, 'स्कॅरी पिक्चर'मधून प्रेक्षकांना घाबरवणार
Recommended image3
Sridevi Love Story : 'विवाहित पुरुषाशी लग्न करणार नाही' म्हणणारी श्रीदेवी 2 मुलांच्या वडिलांच्या प्रेमात कशी पडली?
Recommended image4
Aishwarya Rai Bachchan Birthday : देवदास ते धूम 2, ऐश्वर्याचे 10 आयकॉनिक ऑन-स्क्रीन लूक्स
Recommended image5
Meena Kumari : 200 सिनेमे गाजवणारी ही स्टार अभिनेत्री 30 वर्षे अज्ञातवासात का गेली?
Related Stories
Recommended image1
Rashmika Mandanna : रश्मिकाची मोठी झेप! दीपिकाला मागे टाकत बनली देशाची नंबर वन अभिनेत्री
Recommended image2
Khushi Kapoor New Home : खुशी कपूरची नवी गुंतवणूक, वांद्र्यात फक्त १८० sq ft चा फ्लॅट घेतला तब्बल ६३ लाखांना
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved