Tiger Shroff case

Share this Video

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील तीन संशयितांना कोटा पोलिसांनी रेल्वेतून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी दिली. संशयित दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं. मुंबई पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांत कोटा पोलिसांनी पथकं तैनात करून कारवाई केली. रेहान नावाच्या संशयिताचा अनिल पंडितशी संपर्क झाल्याची माहिती मिळाली असून दोन संशयितांवर प्रत्येकी एक गुन्हा असल्याचं प्राथमिक चौकशीत आढळलं. राजस्थान किंवा कोट्याशी संशयितांचा स्थानिक संबंध अद्याप समोर आलेला नाही. कारवाईत कोटा पोलीस, RPF आणि AGTF जवान सहभागी होते. संशयितांना पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार असून कारवाई करणाऱ्या पथकाच्या कौतुकासाठी वरिष्ठांकडे शिफारस केली जाणार आहे.

Related Video