
Tiger Shroff case
मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे DCP राज तिलक रोशन यांनी दिली. दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी दोघांनी चार ते पाच गोळ्या झाडल्याचं त्यांनी सांगितलं. तपासासाठी गुन्हे शाखेची सुमारे २० विशेष पथकं तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि CCTV च्या मदतीने अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी शोधण्यात आली. संशयित सुरतमार्गे रेल्वेने पुढे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर कोटा पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडण्यात आलं. तिघांपैकी दोघे हरियाणाचे तर एक बिहारचा आहे. या प्रकरणात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास खंडणीविरोधी पथकाकडे आहे. संशयितांचा नेमका हेतू, शस्त्रांचा स्रोत, इतर साथीदार आणि सोशल मीडियावरील कथित जबाबदारीच्या पोस्टची पडताळणी सुरू आहे. पुढील चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया कायद्यानुसार सुरू असल्याचं रोशन यांनी सांगितलं. या कारवाईत गुजरात, राजस्थान आणि दिल्ली पोलिसांचीही मदत झाल्याचं त्यांनी नमूद केलं.