Tiger Shroff case

Share this Video

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात राजस्थानच्या कोटा पोलिसांनी रेल्वेतून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी दिली. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या १५ ते २० मिनिटांत विशेष पथकं तयार करून कोटा जंक्शनवर संपूर्ण रेल्वेची तपासणी करण्यात आली. CCTV फुटेजच्या मदतीने रेहान, ऋतिक उर्फ रोशन आणि एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. दोघे हरियाणातील सोनीपतचे, तर एक बिहारमधील बेगुसरायचा रहिवासी असल्याचं त्यांनी सांगितलं. प्राथमिक चौकशीत संशयितांनी गोळीबार केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अनिल पंडितच्या संपर्कातून पैसे आणि परदेशात स्थायिक करण्याचं आमिष दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली. संशयितांकडून शस्त्रं जप्त झालेली नाहीत. पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी तिघांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जात आहे.

Related Video