
Thane Firing
ठाणे फायरिंग प्रकरणानंतर शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांचे सासरे संजय गोविंदराव खांगटे यांनी कुटुंबाला न्याय मिळावा आणि या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेही त्यांनी न्यायाची विनंती केली. राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे सांगत कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. तरुणांनी गुन्हेगारीपासून दूर राहून शिक्षण, काम आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रदीप पूर्णेकर हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ होते आणि इतरांकडून ऑफर मिळूनही त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही, असेही खांगटे यांनी सांगितले.