
Pune Lohagad case l पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितली संपूर्ण घटना । Pune Police
पुण्यातील लोहगड किल्ला मृत्यू प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये साखरपुडा झालेल्या Sia Goyal आणि Ketan Agarwal हे दोघे लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. सुरुवातीला Ketan Agarwal घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.तपासात Sia Goyal आणि Chetan Chaudhary यांच्यात संबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी CDR, IPDR, CCTV तसेच इतर तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. पोलिसांच्या माहितीनुसार, आधीपासून आखलेल्या कटानुसार दोघांनी मिळून Ketan Agarwal याला किल्ल्यावरून ढकलल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
