वडगाव घेनंद येथे जुन्या वादातून अल्पवयीन तरुणाने महिलेच्या अंगावर घातली कार, महिला जखमी तर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

| Published : Jun 17 2024, 03:55 PM IST / Updated: Jun 17 2024, 04:03 PM IST

pune car
वडगाव घेनंद येथे जुन्या वादातून अल्पवयीन तरुणाने महिलेच्या अंगावर घातली कार, महिला जखमी तर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

वडगाव घेनंद गणेशनगर येथे आरोपी शेजारी राहायला असून जुन्या वादाचा राग मनात धरून महिलेच्या अंगावर गाडी घातली आहे.

 

शेलपिंपळगाव : वडगाव-घेनंद येथे यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून एका अल्पवयीन तरुणाने भरधाव चारचाकी वाहन महिलेच्या अंगावर घातल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या घटनेत संबंधित महिला जखमी झाली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास वडगाव-घेनंद हद्दीतील गणेशनगर येथे ही घटना घडली.

याप्रकरणी नाजुका रणजीत थोरात (वय २४ वर्षे, धंदा गृहिणी, रा. गणेशनगर, वडगाव घेंनद ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून साई सतिष बवले (वय १७ वर्ष रा. गणेशनगर, वडगाव घेंनद, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहायला आहेत. मात्र यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी साई बवले याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन वेगाने चालवून 'थांब तुला गाडी खाली चिरडुन जिवे ठार मारतो' असे म्हणत फिर्यादी नाजूका थोरात यांच्या अंगावर गाडी घातली. तसेच फिर्यादीच्या पतीला 'तुला संपवतो' असे म्हणून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.