सार

Pune Accident : पुण्यात पोर्शे कार अपघातानंतर आता आणखी एका अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

 

Pune Accident : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोर्शे कार अपघातानंतर आता आणखी एका अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याचे समोर आले आहे. एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा वेगाने टँकर चालवत होता, या टँकरने अनेकांना उडवले आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वानवडी परिसरात शनिवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. व्यायामासाठी निघालेल्या मुलांना या टँकरने धडक दिली. यात एका दुचाकी चालक महिलेलाही धडक दिली. या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झाल्या आहेत. हा टँकर 14 वर्षीय मुलगा चालवत होता, नागरिकांनी हा टँकरसह अल्पवयीन मुलाला अडवून ठेवले आहे.

पुण्यात काही दिवसापूर्वीच कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना उडवले होते, या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता हा दुसरा अपघात घडला आहे.

 आणखी वाचा :

Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर 2 कारचा भीषण अपघातात चक्काचूर, 6 जणांचा जागीच मृत्यू